
सांगू का आई....
माझा घसा का बसला?
स्वप्नातच मी
बर्फ खूप खाल्ला
बर्फाच्या डोंगरावर
केली झिम्मड वरती
आईस्क्रिमच आईस्क्रिम
धम्माल नुसती
सांगू का आई...
खरी गोष्ट तुला?
मी नाही केला
हा बिछाना ओला
तुझ्यासाठी बर्फ- गोळा
खिशात होता ठेवला
मला वाटतं तोच
इथे वितळून गेला.
- मानसी साळुंखे, पालक,
जानकी बाई प्रेमसुख झंवर मराठी शाळा, सातारा.