स्त्रीशक्ती स्वरूपा सांगता समारंभानिमित्त : 'मर्मबंधातील ठेव ही....' संगीतमय कार्यक्रमाचे नियोजन

स्त्रीशक्ती स्वरूपा सांगता समारंभानिमित्त : "मर्मबंधातील ठेव ही...." संगीतमय कार्यक्रमाचे नियोजन

शिक्षण विवेक    19-Oct-2023
Total Views |
 
स्त्रीशक्ती स्वरूपा सांगता समारंभानिमित्त : 'मर्मबंधातील ठेव ही....' संगीतमय  कार्यक्रमाचे नियोजन
गुरुवार, दि. १९ ऑक्टोबर २०२३ रोजी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिशुविहार प्राथमिक शाळा, कर्वेनगर या शाखेमध्ये वंदे स्त्रीशक्ती स्वरूपा सांगता समारंभानिमित्त 'मर्मबंधातील ठेव ही....' या जुन्या व दुर्मीळ प्रार्थना व कविता यांच्या संगीतमय सुरेख कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. रवींद्र देव, उपकार्याध्यक्ष विद्या कुलकर्णी, संगीततज्ञ मधुरा चितळे यांची उपस्थिती लाभली. शिशुविहार प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता वैद्य यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे संगीत संयोजन मयुरा मुळे आणि ज्ञानेश्वरी पवार यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थिनीनी सादर केला.
जुनं ते सोनं या उक्तीप्रमाणे अनेक जुन्या प्रार्थना व कविता विद्यार्थिनींनी सुरेल आवाजात सादर केल्या. स्पष्ट उच्चार, ओघवती भाषाशैली, योग्य हावभावांसह या कार्यक्रमाचे निवेदन विद्यार्थिनींनी उत्कृष्टपणे सादर केले. सादरकर्त्या विद्यार्थिनींचे पालक आणि साहित्याची जाण असणाऱ्या रसिकानी संपूर्ण कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.