पाटलाची हुशारी आणि शास्त्रज्ञाची समजदारी

पाटलाची हुशारी आणि शास्त्रज्ञाची समजदारी

शिक्षण विवेक    02-Oct-2023
Total Views |

 पाटलाची हुशारी आणि शास्त्रज्ञाची समजदारी
एक गाव होत. त्या गावाचं नाव टोकेवाडी असं होतं. गावात दुष्काळ पडला होता. त्या गावात एक पाटील राहत होता. त्या गावातले लोक खूप झाडे तोडत होते. त्यामुळे तिथे दुष्काळ पडला होता. त्या गावाचा पाटील त्या लोकांना म्हणाला की, ‘तुम्ही झाडे तोडू नका. तुम्ही झाडे तोडत राहिलात तर इथे पाऊस कसा पडेल?’ त्या गावातल्या लोकांना समज आली. मग त्या लोकांनी झाडे तोडायचं बंद केलं. मग ते सगळे लोक झाडे लावू लागले. त्या गावात एक शास्त्रज्ञ राहत होता. तो लोकांना म्हणाला की, ‘जिथे झाडेझुडपे तेथे पाऊस पडे.’ लोकांना समज आली होती. पण शास्त्रज्ञांनी पण त्या लोकांना सल्ला दिला. मग थोड्या दिवसांनी तिथे पाऊस पडला. रा गोष्टीवरून हे कळतं की, झाडे तोडू नये.
 
- अमृता चोरमले,
आर्य चाणक्य विद्या मंदिर, पैठण