डी.इ.एस् प्रायमरी स्कूल येथे इयत्ता चौथीमार्फत ‘महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती’ व ‘महाराष्ट्राची खाद्यभ्रमंती’ हा उपक्रम साजरा

‘महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती’ व ‘महाराष्ट्राची खाद्यभ्रमंती’

शिक्षण विवेक    21-Oct-2023
Total Views |

 
‘महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती’ व ‘महाराष्ट्राची खाद्यभ्रमंती’

   डी.इ.एस् प्रायमरी स्कूल येथे अनुक्रमे ३ ऑक्टोबर २०२३ व १० ऑक्टोबर २०२३ (सकाळ सत्र व दुपार सत्र), रोजी, इयत्ता चौथीने ‘महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती’ व ‘महाराष्ट्राची खाद्यभ्रमंती’ हा उपक्रम राबविला.

   इयत्ता चौथीच्या परिसर अभ्यास (EVS 1) या पाठ्यपुस्तकात ‘The Variety in food’ असा पाठ आहे. या पाठाअंतर्गत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात बनवले जाणारे खाद्यपदार्थ व ते ज्या धान्यापासून बनवतात त्याची माहिती देण्यात आली आहे.

   महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची वेशभूषा, येथील सणांची परंपरा त्याचबरोबर अस्सल महाराष्ट्रीय पदार्थांची ओळख मुलांना व्हावी, ते कसे बनवतात? हे पाहता यावं आणि त्याचा स्वाद कसा असतो हे कळावं, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. आणि अर्थातच या उपक्रमाला घवघवीत यश मिळालं,

   या उपक्रमासाठी रांगोळीतून महाराष्ट्राचा नकाशा काढण्यात आला होता. ‘माझं माजघर’ या संकल्पनेअंतर्गत ‘चूल, पाटा – वरवंटा, खलबत्ता, उखळ, जातं, सूप, रवी, विळी, मोदकपात्र, पितळ्याची, मातीची भांडी, मापटं आणि तुळशी वृंदावन ही मांडण्यात आलं होतं. केळीच्या पानावर मान्यवरांची पंगत बसली होती.

   विद्यार्थी व पालकांनी ‘लुसलुशीत पुरणपोळी, वाफाळलेले उकडीचे मोदक, झणझणीत मिसळ, चमचमीत अळूवडी कोथिंबीर वडी, सुरळी वडी, चविष्ट मसालेभात, वाडा भात, पाटवडी रस्सा, वाटली डाळ, दडपे पोहे, घारगे, थालीपीठ, सोलकढी, मठ्ठा, हरभरा उसळ, भाकरी पिठलं, वांग्याचं भरीत, इंद्रायणी भात, ताबडा रस्सा, नारळीभात असे अनेक अस्सल महाराष्ट्रीय पदार्थ बनवून आणले.

   या चविष्ट पदार्थांचा आस्वाद, विद्यार्थी, शिक्षकवर्ग, मावशी दादांपासून सफाई कामगारांपर्यंत सर्वांनी घेतला व तृप्त झाले आणि ‘अन्नदाता सुखी भव’ असं भरभरून आशीर्वाद दिला

सौ. रुपाली बेडेकर

सौ. हर्षदा कारेकर