साहित्य : ७-८ कुरडया, बारीक चिरलेला 1 कांदा, ७-८ कढीपत्ता, ७-८ लसूण पाकळ्या, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, १ चमचा लाल तिखट, तेल.
कृती : पाणी कोमट करून त्यात कुरडयांचा चुरा भिजत ठेवा. कढईत तेल घालून फोडणी करा. त्यात मोहरी, जिरे, हिंग, लसूण घाला. थोडे परतून झाल्यावर त्यात कढीपत्ता, कांदा घालून परतून घ्या.
कुरडईतील पाणी काढून घ्या. कांद्याला सोनेरी रंग आल्यावर त्यात लाल तिखट घाला. आता यामध्ये कुरडई घाला. मीठ घाला. व्यवस्थित मिसळून घ्या. झाकण ठेवून मध्यम आचेवर एक वाफ काढून घ्या. सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला, पौष्टिक भाजी तयार.
- केतकी बेडकिहाळ