शिक्षण माझा वसा ( राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार २०२४ )

शिक्षण विवेक    05-Oct-2023
Total Views |

शिक्षण विवेक आणि टी. बी. लुल्ला चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने

शिक्षण माझा वसा’ (राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार, २०२४)

शिक्षणाचा ध्यास घेऊन विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची इच्छा, आवड निर्माण करण्यासाठी शिक्षक सातत्याने कार्यरत असतात. आपल्याकडील माहितीला अनुभवाची जोड देत वैविध्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा अवलंब करणारे शिक्षक नेहमीच कौतुकास पात्र ठरतात. या शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी ‘शिक्षण माझा वसा’ या राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्काराचे आयोजन करण्यात आलेले आहे. 

जानेवारी २०२४ मध्ये होणाऱ्या या राज्यस्तरीय पुरस्कार वितरणासाठी महाराष्ट्रातील केवळ स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद शाळा, खासगी अनुदनित शाळांतील शिक्षकांची ज्ञानरचनावादावर आधारित नाविन्यपूर्ण उपक्रमांची नामांकने मागवत आहोत. यामध्ये ५ अध्यापन विषय (१. भाषा : मराठी / हिंदी / इंग्रजी, २. गणित, ३. विज्ञान, ४. कला : चित्र / नाट्य / शिल्प / संगीत, ५. तंत्रज्ञान), एक उपक्रमशील मुख्याध्यापक व एक विशेष पुरस्कार अशा सात पुरस्कारार्थींची निवड केली जाणार आहे.

पुरस्काराचे स्वरूप : सन्मानचिन्ह, मानपत्र व रू. ५,०००/-

नामांकनासाठीचे नियम व निकष :

  •  नामांकन पाठवणार्‍या शिक्षकाचे कमाल वय ४५ वर्षे असावे. (दि. ३० नोव्हेंबर, २०२३ पर्यंत)
  •  जन्मदाखला पुरावा आवश्यक आहे. (उपक्रमशील मुख्याध्यापक पुरस्कारासाठी वयाची अट नाही.)
  •  शाळा अनुदानप्राप्त असल्याचा दाखला आवश्यक आहे. (खासगी अनुदानित शाळांतील शिक्षकांसाठी)
  •  अर्ज करणार्‍या शिक्षकांनी सध्या कार्यरत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांच्या सहीचे पत्र गुगल फॉर्ममध्ये जोडावे. उपक्रमशील मुख्याध्यापक या नामांकनांसाठी शालासमिती अध्यक्षांच्या सहीचे पत्र जोडावे. (पत्रामध्ये शिक्षक/मुख्याध्यापकाच्या नावाचा उल्लेख असणे आवश्यक आहे.)
  •  किमान ३ वर्षे एका उपक्रमाची अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता सिद्ध झालेली असावी.
  •  कला शिक्षकांसाठी शासन नियुक्ती अनिवार्य आहे.
  •  नामांकन पाठवण्याची अंतिम दिनांक : १५ डिसेंबर, २०२३
  •  निवड समितीचा निर्णय अंतिम असेल.

नामांकन पाठवण्याचे स्वरूप :

  • आपल्या उपक्रमाची माहिती पुढील मुद्यांच्या आधारे पाठवावी.
  • शिक्षकाचे नाव, शाळेचे नाव व पत्ता, उपक्रमाचे नाव, उपक्रमाची गरज, उपक्रमाची कार्यपद्धती व अंमलबजावणी, उपक्रमात आलेल्या अडचणींवर केलेल्या उपाययोजना, निष्कर्ष, पुढील नियोजन.
  •  उपक्रमासंबंधीची छायाचित्रे.
  •  वरील माहिती ‘शिक्षणविवेक’, म.ए.सो. भवन, १२१४-१२१५ सदाशिव पेठ, पुणे 30 या पत्त्यावर कुरिअरद्वारे किंवा mazavasa2024@gmail.com या मेल आयडीवर पाठवावी.
  •  किंवा ही सर्व माहिती ऑनलाईन भरण्यासाठी https://forms.gle/DEDHPevEgQNdJyDe7 या गुगल फॉर्म लिंकचा वापर करावा. फॉर्म भरल्यानंतर 9112257774, 8421118632 या संपर्क क्रमांकावर मेसेज करावा.

सदर माहिती आपल्या परिसरातील शिक्षकांना पाठवून प्रचार व प्रसार करावा.