माझा आवडता पदार्थ

माझा आवडता पदार्थ

शिक्षण विवेक    09-Oct-2023
Total Views |

माझा आवडता पदार्थ
माझा आवडता पदार्थ पोळी
साधी पोळी नाही तर पुरणाची पोळी॥१॥
पुरणपोळी करताना होतो त्रास
खायला मात्र लागते खास॥२॥
पुरणपोळीला लेकुरवाळी म्हणतात
कारण पुरणपोळीबरोबर अनेक पदार्थ ताटात असतात॥३॥
चटणी, कोशिंबीर, कुरडई, भाजी, भजे, आमटी
पोळीच्या सोबत साजूक तूपाची वाटी॥४॥
ताटाच्या मधोमध भाताची मूद
त्यावर असते वरण आणि साजूक तूप॥५॥
असे वेगवेगळे पदार्थ एकाच जेवणात खायला असतात
म्हणूनच पुरणपोळीला सर्व पक्वान्नांचा राजा म्हणतात॥ ६॥
अशी ही पुरणपोळी, तिला सर्व सणांना असतो मान
म्हणूनच ती महाराष्ट्राची आहे शान॥ ७॥
- मंजुषा निमगांवकर, सहशिक्षक,
स्वा. सावरकर प्राथमिक विद्यालय, बीड