शिक्षण प्रसारक मंडळीच्या निगडी, शाळेत रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थी आणि पालकांच्या समवेत वसुबारस व दीपोत्सव साजरा

शिक्षण प्रसारक मंडळीच्या निगडी, शाळेत रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थी आणि पालकांच्या समवेत वसुबारस व दीपोत्सव साजरा

शिक्षण विवेक    11-Nov-2023
Total Views |

शिक्षण प्रसारक मंडळीच्या निगडी, शाळेत रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थी आणि पालकांच्या समवेत वसुबारस व दीपोत्सव साजरा   
   दि. ९ नोव्हेंबर २०२३ वार :गुरुवार रोजी शि. प्र. मंडळीच्या मराठी व इंग्रजी माध्यमाच्या निगडी शाळेमध्ये दिवाळी सणाचे औचित्य साधत भारतीय परंपरेनुसार साजरा करण्यात येणाऱ्या वसुबारस व दीपोत्सव या कार्यक्रमाचे उद्घाटन शि. प्र.मंडळी नियमक मंडळ अध्यक्ष मा. मा.ॲड.एस. के जैन सर यांच्या हस्ते झाले. शि.प्र मंडळी उपाध्यक्ष मा.श्री गजेंद्रजी पवार तसेच सल्लागार शि. प्र.मं. नियामक मंडळ मा.श्री सुधीरजी काळकर
मा. श्री रवीजी रबडे प्रांत गो सेवा संयोजक, सदस्य मा.श्री गिरीषजी वायकर , मा. श्री मिलिंदजी देशपांडे बांधकाम व्यवसायिक तसेच निगडीचे नगरसेवक मा.श्रीमती सुमनताई पवळे व मा. श्री.उत्तम केंदळे सर
यांच्या प्रमुख उपस्थितीने कार्यक्रम अधिक प्रेरणादायी झाला. या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून नंद नंदिनी परिवाराचे मा. श्री अजित परांजपे लाभले होते.
सर्व मान्यवर शाळेचे सर्व मा.मुख्याध्यापक , पालक व विद्यार्थी यांचा हस्ते गोमाता पूजन व आरती करण्यात आली.
शालेय विद्यार्थ्यांना वसुबारस या दिवशी गोमाता पूजन कसे केले जाते, भारतीय संस्कृतीत गाईला असलेले महत्त्व , गाईच्या दुधापासून तयार करण्यात येणारे विविध पौष्टिक पदार्थ तसेच या पदार्थांचा उपयोग आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसा करावा हे समजावे हा शाळेचा मुख्य उद्देश होता.
प्रमुख वक्ते मा.श्री अजित परांजपे यांनी गाईचे भारतीय संस्कृतीत असणारे धार्मिक व समाज जीवनातील स्थान तसेच आजच्या विज्ञान युगातील गाईचे महत्व विशद केले.
तसेच आजच्या दिवसाचे औचित्य साधून शि. प्र. मंडळीच्या, निगडी शाळेची फेसबुक , इंस्टाग्राम पेज व युट्युब चॅनलचा शुभारंभ करण्यात आला
या दिवशीच शाळेमध्ये पालकांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच
सर्व विद्यार्थी व पालक यांच्या हस्ते शाळेच्या वास्तूमध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला. शाळेची भव्य इमारत दिव्यांच्या प्रकाशाने सुशोभीत दिसत होती.
या कार्यक्रमाला शाळेतील सर्व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
वरील सर्व कार्यक्रमांसाठी शि. प्र. मंडळी निगडी शाळेचे कार्याध्यक्ष मा.श्री ॲड. दामोदरजी भंडारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मा. मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहभागाने कार्यक्रम संपन्न केला.