तेजोमय दीप लावू धरतीवर
चला, तेजोमय दीप लावू धरतीवर
सिद्ध होण्या समता, मानवतेचे वर
उजळत राहो सदा माणुसकीचे घर
चला,दीप,पणतीसम जगू जन्मभर ||ध्रु ||
चला,तेजोमय दीप लावू धरतीवर
तिमिर मिटवू लावूनि प्रेम ज्योती
आनंदी सारे विश्व, स्नेही, नातीगोती
चैतन्याची भरारी घेऊ गगनावर ||१ ||
घरोघरी, मनोमनी दीप लावूया
सत्य, मानवतेचे गीत गाऊया
एकीने गाऊ नाचू सारे नारीनर ||२ ||
सारे मागू मागणे घडण्या जीवन
सूर्य,चंद्र, ताऱ्यांसम आपुले स्मरण
तेजस्वी सद् कार्य करू जन्मभर||३ ||
©गीत: राघवेंद्र रामकृष्ण गणेशपुरे
शिक्षक,डी.ई.एस.सेकंडरी शाळा,
टिळक मार्ग,पुणे- ३० भ्रमणध्वनी:८०५५२०१६५५