भाऊबीज
आली आली भाऊबीज,
तिचं स्वागत करूया भाऊराया ओवाळूनी,
हा सण टाके दिशा दाही उजळूनी,
सुख, समृद्धी आणि हर्षाचा .
हा सण करतो नाती आणखीनच घट्ट,
ज्यात असते प्रेम, माया, आपुलकी आणि हक्क,
जी भावना असते खूपच मस्त,
या नात्यात काही माझं तुझं नसतं,
जे देतं आपल्याला आनंद जास्त.
हा सण आपल्या दुरावलेल्या नात्यांना आणतो एकत्र,
आणि करतो आपल्या आयुष्यातील अंधःकार दूर मात्र,
म्हणूनच असते याला महत्त्व,
ज्या मुळे घेतं बहिण भावाचं नातं आणखीणच घट्ट.
अंकिता कुंडालेक भगत
म.ए.सो विद्यालय बारामती
इयत्ता – आठवी