दिवाळीची जादू

दिवाळीची जादू

शिक्षण विवेक    16-Nov-2023
Total Views |

दिवाळीची जादू 
दिवाळीच्या जादूची ही आली आली गाडी।।
चला आता झटपट काढू नका खोडी।।
 
कोणा काय हवे बोला सारे काही मिळे||
 चंद्रज्योती फुलबाजे फटाकड्या निळे।।
 
पहा केवढे मोठे तोटे ||
लहानांनो तुम्ही नका जाऊ याच्या वाटे ||
 
दिवाळीच्या जादूची ही आली आली गाडी।।
चला आता झटपट काढू नका खोडी।।
 
लहानांसाठी उडवायला पिस्तुलाचे फुले ||
तसे जरा मोठ्यांसाठी भुईचक्कर फिरे ||
 
उगी हट्ट धरू नका ॲटम बॉम्ब साठी ||
दिवाळीच्या जादूची ही आली आली गाडी।।
 
चला आता झटपट काढू नका खोडी।।
नाही गडे करायची गाडी भोवती दाटी ||
 
चला आता दूर सरका खूप वेळ झाला ||
प्रत्येकाचा घरासाठी नाही गाडी बाळा ||
 
दिवाळीच्या जादूची ही आली आली गाडी।।
चला आता झटपट काढू नका खोडी।।
 
श्रीमती भारती सुमती अरुण
सहशिक्षिका..श्री सिध्देश्वर प्राथमिक विद्यालय ,माजलगाव