माझा महाराष्ट्र

माझा महाराष्ट्र

शिक्षण विवेक    02-Nov-2023
Total Views |
 
माझा महाराष्ट्र
माझा महाराष्ट्र नावाप्रमानेच महान आहे. म्हणून मला माझ्या महाराष्ट्राचा खूप अभिमान वाटतो. १ मे १९६० रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे. महाराष्ट्र हा बहुतांश डोंगराळ प्रदेश, पण मराठी माणसाने कष्ट करुन सुपीक केला आहे. ऊस पिकवून साखर कारखाने उभारले. फळाफुलांच्या बागा फुलवल्या. महाराष्ट्रातल्या हापूसने आज सारे जग जिंकले. माझ्या महाराष्ट्राला दैदिप्यमान इतिहास आहे. श्री शिवरायांनी पहिले जनतेचे राज्य उभारले. त्या काळाची आठवण देणारे अनेक गड, दुर्ग महाराष्ट्रात आहेत. शिल्पकारांच्या बोटातील जादू दाखवणारी अजिंठा-वेरुळची लेणी महाराष्ट्रात आहेत. गोदा, भीमा, चंद्रभागा या नद्यांकाठाची तीर्थक्षेत्रे आणि अनेक मंदिरे यांनी महाराष्ट्र समृद्ध केले आहे. मुंबई ही भारताची आर्थिक आणि औद्योगिक राजधानी आहे. शिक्षण आणि साहित्य या क्षेत्रांत महाराष्ट्र सदैव अग्रभागी आहे. महाराष्ट्रात अनेक रत्ने जन्माला आली. महाराष्ट्राचा मराठी बाणा जगात विख्यात आहे.
- ईश्‍वरी मोरे,
जानकीबाई प्रेमसुख संवर मराठी शाळा, सातारा