नू.म.वि. मराठी शाळेला स्वच्छतेचा राज्यस्तरीय पुरस्कार

नू.म.वि. मराठी शाळेला स्वच्छतेचा राज्यस्तरीय पुरस्कार

शिक्षण विवेक    23-Nov-2023
Total Views |
 
नू.म.वि. मराठी शाळेला स्वच्छतेचा राज्यस्तरीय पुरस्कार
नू.म.वि. मराठी शाळेला स्वच्छतेचा राज्यस्तरीय पुरस्कार
शिक्षण प्रसारक मंडळी पुणे संचलित सोलापूर येथील नू.म.वि. मराठी शाळेला स्वच्छता मॉनिटरचा राज्यस्तरीय प्रभावी शाळा पुरस्कार प्राप्त झाला.
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. निष्काळजी मुक्त महाराष्ट्र पी एल सी या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री मा. श्री दीपकजी केसरकर साहेब, शिक्षण प्रधान सचिव श्री रणजित देओल साहेब, कलाकार श्री प्रेम चोप्रा,सहसचिव श्री इम्तिहास काझी प्रकल्प अधिकारी श्री रोहित आर्या या प्रोजेक्टला पाठिंबा देणारे श्री शरद नयनपल्ली उपस्थित होते. प्रकल्प व्यवस्थापक श्री सागर याळवार व सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या विस्ताराधिकारी स्वाती स्वामी, गोदावरी राठोड तसेच महाराष्ट्रातील शाळा, शिक्षक, विद्यार्थीयांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला,
महाराष्ट्र कचरा बाबत निष्काळजी मुक्त करण्याच्या शिक्षण विभागाच्या पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात 64000 शाळांनी सहभाग नोंदवला होता त्यापैकी सर्वाधिक प्रभावी शंभर शाळांना राज्य पुरस्काराने गौरविण्यात आले हा पुरस्कार शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वर्षा जेधे मॅडम व समन्वयक सौ रोहिणी चौधरी मॅडम तसेच स्वच्छता मॉनिटर विद्यार्थ्यांनी स्वीकारला.
या यशाबद्दल शाळा समितीचे अध्यक्ष श्री राजेश पटवर्धन सरांनी स्वच्छता मॉनिटरला शाब्बासकी दिली व शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.