लालबहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालयात पारख 2023 परीक्षा घेण्यासाठी आलेले अधिकारी माजी विद्यार्थी मा. संजीव कबाडे सर यांचे आदरणीय मुख्याध्यापक श्री मिरगुडे साहेब, विभाग प्रमुख श्री पोलावार सर यांच्या हस्ते पुस्तक व पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
शिक्षण विवेक मार्फत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मा. संजीव कबाडे सर, आदरणीय मुख्याध्यापक मिरगुडे सर, विभाग प्रमुख पोलावार सर यांच्या हस्ते खाऊचं झाड नाट्यछटा संग्रह हे पुस्तक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
मा. संजीव कबाडे सर माजी विद्यार्थी यांनी सांगितले की, मी या शाळेत शिकलो म्हणून मी संस्कारक्षम, आदर्श नागरिक, बनलो. या शाळेत परीक्षा घेण्यासाठी माझी निवड करण्यात आली हे मी माझे भाग्य समजतो. कारण त्यावेळचा परिपाठ व आजचा परिपाठ यामध्ये अजिबात फरक नाही. तसेच इथे विविध उपक्रम होतात. तुम्ही सर्वांनी परिपाठाच्या वेळेस उपस्थित राहणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे असे सांगितले.
आदरणीय मुख्याध्यापक मिरगुडे सर यांनी विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षेत सहभाग घेऊन गुणवंत,संस्कारक्षम, आदर्श नागरिक बनावे व शाळेतील विविध उपक्रमात सहभाग घ्यावा असे सांगितले. शिक्षण विवेक संपादक श्री केंद्रे सर यांनी आभार मानले व सर्व शिक्षक कर्मचारी यांनी सहकार्य केले.