शिक्षण विवेक च्या दिवाळी अंकाचे विमोचन स्वा. सावरकर माध्यमिक विद्यालयात संपन्न. यावेळी विद्यासभा उपाध्यक्ष तथा केंद्रिय कार्यकारिणी सदस्य मा उमेशजी जगताप, मुख्याध्यापक श्री विजेंद्र चौधरी, पर्यवेक्षक श्री दत्तात्रय तांबारे, स्थानिक शिक्षण विवेक प्रमुख सौ. गौरी डावखरे व इतर शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. मुलांचे भावविश्व जपणारे, आणि मुलांमधील अंगभूत कौशल्याला वाव देणारे मासिक म्हणजे शिक्षणविवेक. रानमेवा : दिवाळी विशेषांकाचे विमोचन या कार्यक्रमप्रसंगी करण्यात आले.