मित्र

मित्र

शिक्षण विवेक    12-Dec-2023
Total Views |

 
मित्र 

मित्र
कागद आणि पेन दोघे आहेत मित्र,
कधी लिहीतात अक्षरं तर कधी काढतात चित्रं॥

पूर्ण जगात मैत्री त्यांची न्यारी,
सगळ्यांपेक्षा आहे थोडी मस्ती भारी ॥

कागदाला वापरा फारच जपून,
नाहीतर जाईल सगळे संपून॥

कागद करण्यासाठी झाड पडते बळी,
कागद जपून वापरूया हे उतरवूया सर्वांच्या गळी॥

कागद नसेल तर शिकू नाही शकणार,
कामामध्ये मग नेहमीच चुकणार॥

जाणलं ना मग महत्व कागदाचे,
तेच सर्वांसाठी आहे महत्त्वाचे आणि मोलाचे॥

- आर्यन घनवे, 7 वी,
शिशुविहार प्राथमिक शाळा, एरंडवणा