गीतरामायणा वर संगीत नाटिका सादर

गीतरामायणा वर संगीत नाटिका सादर

शिक्षण विवेक    27-Dec-2023
Total Views |

गीतरामायणा  वर संगीत नाटिका सादर  
रविवार दि. २४/१२/२०२3 रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या पूर्व प्राथमिक मुरलीधर लोहिया मातृमंदीर शाळेच्या अडीच ते साडेपाच वर्षे वयोगटातील ६०० व अधिक विद्यार्थ्यांनी गीतरामायणाचे जनक गदिमा आणि सुधीर फडके यांच्या गीतरामायणा वर संगीत नाटिका सादर केली. अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर या आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात चिमुकल्यांनी रंगमंचावर अक्षरशः रामचरित्र जिवंत साकारले. यावेळी शाळेने Wonder book of Record International हे आंतरराष्ट्रीय आणि World Records India हे राष्ट्रीय विक्रम केले. या कार्यक्रमाला गदिमांचे सुपुत्र श्री. आनंद माडगुळकर आणि ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली. मुख्याध्यापिका सौ. माधुरी बर्वे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची सांगता झाली.