खरंच आयुष्य किती छान आहे!

खरंच आयुष्य किती छान आहे!

शिक्षण विवेक    29-Dec-2023
Total Views |


खरंच आयुष्य किती छान आहे!

खरंच आयुष्य किती छान आहे!
उसने थोडे, जगलो थोडे महान आहे
हृदयातील प्रेमास अश्रूंची तहान आहे
आंधळ्यांच्या घोळक्यात डोळ्यांना अनुदान आहे
खरंच आयुष्य किती छान आहे!

अपुर्‍या पगारात महागाई ताण आहे
कपाळावरील आठ्या चिंतेचा प्राण आहे
थोड्या झिजल्या, थोडा ताण आहे
कवटीतील मेंदूला स्मशानाचे भान आहे
खरंच आयुष्य किती छान आहे!

सुकलेल्या तळ्याकाठी बगळ्यांची कमान आहे
पर्यटकाच्या कॅमेरात कलेची शान आहे
दोन थेंबांच्या शोधात मृगजळास अभिमान आहे
बेडकाचे आयुष्य कोरड्या चिखलात महान आहे
खरंच आयुष्य किती छान आहे!

- गायत्री रामेश्वर माने, ९ वी,
श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालय, अंबाजोगाई