मुद्रणकला! मुद्रणकला!!

मुद्रणकला! मुद्रणकला!!

शिक्षण विवेक    07-Dec-2023
Total Views |

मुद्रणकला! मुद्रणकला!!
९८१ वर्षे पूर्ण झाली या अद्भूत, रोमांचकारी कलेला,
सलाम तो शोध लावणार्‍या योहानेस गुटेनबर्ग यांना|
मुद्रणकला म्हणजे कागदावर उमटविलेला ठसा,
मनातील विचारांच्या अभिव्यक्तीसाठी घेतलेला वसा|
मुद्रणकलेमुळे झालो आपण वैचारिक दृष्ट्या समृद्ध,
वाचनकलेत पारंगत होण्यास सदैव कटिबद्ध|
अक्षर संवादांचा आनंद आहे मुद्रणकला,
परंपरा, संस्कृती यांना जोपासणारी ही शृंखला|
पुस्तके, वर्तमानपत्रे, मासिके, चित्रे ही याची स्वरूपे,
काळानुरूप बदलत गेली संवाद साधण्याची तंत्रे|
इंटरनेट, गुगलच्या जमान्यात एका क्लिकवर मिळते माहिती,
मुद्रणकलेला बगल देऊन कशी होईल लेखनात प्रगती|
मिळालेले यश, कौतुक, प्रशंसा यांना चढतो सोनेरी साज,
जेव्हा छापून येते स्वत:चे नाव, जिथे-तिथे खास|
मुद्रणकला ही आहे जागतिक अनमोल ठेवा,
पिढ्यानपिढ्या जपावी अशी ही जादुगाराची किमया|
 
- ज्योती भुजबळ, शिक्षक,
महिलाश्रम हायस्कूल, कर्वेनगर