जीविधा व्याघ्र संवर्धन प्रदर्शन

पुस्तकांशिवाय शाळा असा वेगळा अभ्यास व माहिती ह्या प्रदर्शन भेटीतून विद्यार्थ्यांना मिळाली.

शिक्षण विवेक    07-Dec-2023
Total Views |
 
म.ए.सो.
 
 "जीविधा व्याघ्र संवर्धन प्रदर्शन " पुस्तकांशिवाय शाळा असा वेगळा अभ्यास व माहिती ह्या प्रदर्शन भेटीतून विद्यार्थ्यांना मिळाली.
. अन्न वस्त्र निवारा या प्राथमिक गरजांसोबतच शुद्ध हवा - पाणी आणि निरोगी पर्यावरण ही देखील प्रत्येक माणसाची गरज आहे. यामुळेच पर्यावरण रक्षणासाठी काम करणाऱ्या श्री. राजीव पंडित यांनी जिविधा संस्थेची स्थापना केली. 2007 साली 'इकॉलॉजिकल सोसायटी' च्या श्री.प्रकाश गोळे सरांनी दिलेल्या मार्गदर्शनातूनच व प्रेरणेतुनच जिविधा संस्थेची स्थापना झाली. 'जिविधा ' याचा अर्थ आहे "जैवविविधता ". जैवविविधतेच्या संवर्धनासाठी जनजागृती व लोकशिक्षण या दोन माध्यमातून संस्थेचे पुणे शहर व परिसरातील ग्रामीण भागात असंख्य उपक्रम सुरू आहेत. हा जगन्नाथाचा रथ ओढण्यासाठी हजारो लाखो, हातांची गरज आहे. आपल्या पिढीला मिळालेला हा नैसर्गिक वारसा पुढील पिढीकडे सुपूर्द करणे हे आपले कर्तव्य आहे. माणसाच्या जीवनात निसर्गाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वने व वन्य प्राण्यांचे संवर्धन करणे ही आज काळाची गरज झाली आहे. माणूस या सर्व बाबतीत संवेदनशील झाल्याशिवाय वन्य प्राण्यांचे संवर्धन शक्य होणार नाही.
भारतातील " व्याघ्र संवर्धना" च्या प्रकल्पला यावर्षी 50 सोनेरी वर्षे पूर्ण झाली. त्यानिम्मिताने 3 दिवसीय प्रदर्शन जीविधाने आयोजित केले होते. हे प्रदर्शन 'यशवंतराव चव्हाण कला दालन', कोथरूड, पुणे येथे आयोजित केले गेले होते. प्रदर्शनास सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी देखील प्रदर्शन बघून आपला सहभाग नोंदविला. प्रदर्शन आयोजित करणारे श्री. राजीव पंडित सरांनी विदयार्थ्यांशी संवाद साधत विदयार्थ्यांना व्याघ्र संवर्धानाचे महत्त्व, प्रकल्प, प्रकल्पतील कामकाज ह्यांची माहिती दिली. तसेच व्याघ्र संवर्धना वरील एक शॉर्ट फिल्म देखील विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याला महाराष्ट्रातील सस्तन वन्यप्रणी ह्यांच्या माहितीचे एक पुस्तक श्री. राजीव पंडित सरांतर्फे भेट देण्यात आले. महाराष्ट्रातील ताडोबा अभ्यारण्याच्या पहिल्या महिला गाईड ' शहनाज बेग' यांच्या देखील भेटीचा योग तेथे जुळून आला. त्यांनी देखील विद्यार्थ्यांशी संवाद साधत ताडोबा अभ्यारण्यातील गंमती जंमती, विविध गोष्टी सांगितल्या.व ताडोबा अभ्याराण्याला नक्की भेट द्यायला या असे आवर्जून सांगितले.विद्यार्थ्यांसोबत प्रदर्शन बघण्यासाठी शिक्षिका सौ. मेघना देशपांडे व ग्रंथपाल सौ. भारती बोऱ्हाडे ह्यादेखील होत्या.