अंगणाचं आत्मवृत्त

शिक्षण विवेक    11-Apr-2023
Total Views |

अंगणाचं आत्मवृत्त
 
 
मित्रांनो, ओळखलं का मला? अरे, मी अंगण बोलतोय. जिथे तुम्ही मुलं खेळता, बागडता. आलं का लक्षात तुम्हाला? मी आज तुम्हाला माझी म्हणजेच अंगणाची जीवनशैली सांगणार आहे.
एक काळ होता तेव्हा मी साधी गवताची जमीन होतो. कालांतराने जेव्हा बदल होत गेले, तेव्हा मानवाने माझ्यावर त्यांच्या निवाऱ्यासाठी झोपड्या उभारण्यास सुरुवात केली. काही मानव आपल्या हक्काची जागा घेत असत. त्या जागेत छोटीशी झोपडी बांधून बाकीची जागा म्हणून मोकळी ठेवत असत. त्याच जागेचा हळूहळू ‘अंगण’ म्हणून विकास होऊ लागला. माझ्यावर शेणा-मातीचा सडा घालून मला सारवले जाऊ लागले. त्यामुळे माझी माती उकरून ती कोणी वर काढणार नाही. नंतर विविधं झाडं माझ्या आवारात लावली जाऊ लागली. सर्वांत पवित्र समजले जाणारे रोपटे म्हणजेच तुळस हेदेखील माझ्याच जागेत लावले जाऊ लागले. त्यामुळे माझेदेखील रोज तुळशीचे दर्शन होते.
कालांतराने मनोरंजनासाठीची जागा म्हणून बाग-बगीचे तायर केले जाऊ लागले. मात्र, अनेकांनी अंगणातच छोटी बाग केली. मला अशा घरांचं आणि लोकांचं खूप कौतुक वाटतं. मी जागेच्या बाबतीत कधी लहान झालो, तर कधी मोठा झालो. काळाच्या ओघात कधी तरी नाहीसाच झालो. मात्र, आजच्या काळातसुद्धा अंगणाशिवाय घराला शोभा नाही, असं म्हणणारे लोक आहेत. माझ्यामुळे घरात प्रसन्न वातावरण राहतं. मुले माझ्यासोबत खेळतात. बायका निवांत गप्पा मारतात. अशा अनेक आठवणीसुद्धा माझ्यात दडलेल्या आहेत.
- भूमी सुर्यवंशी, 9 वी
श्री केशवराज माध्यमिक विद्यालय, लातूर