मी चहा बोलतोय...

शिक्षण विवेक    13-Apr-2023
Total Views |


मी चहा बोलतोय...

माझे नाव चहा सर्वत्र माझी वाहवा होते. मी कुठे नाही? सर्वत्र आहे जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी म्हणतात तसे खेड्यात, शहरात, गरिबांच्या झोपड्यात आणि श्रीमंतांच्या बंगल्यात हरघडी मी तुमचा कंटाळा दूर करतो. दिवसाची सुरुवातच माझ्याशिवाय होत नाही. तसा मी फार पुरातन काळापासून या जगात आहे. माझे मूळ गाव आणि जन्म चीन देशात आहे म्हणणे असे म्हणतात कोणास ठाऊक?

इंग्रज बेट्यांनी सर्वत्र व्यापार करून मला हिंडवले. कामगार साहित्यिक, संशोधक, शिक्षक, प्राध्यापक या सर्वांशी सारखी मैत्री आहे. श्रीमंत लोक मला अधिक चांगले सजवतात. सर्वांना स्फूर्ती देणारा म्हणून माझी कीर्ती आहे. आपल्या देशात माझा जन्म आसामच्या डोंगरकुशीत होतो. हिमालयाच्या पायथ्यावर तराई डोंगराळ भागात मी जन्म घेतो, स्त्रिया, पुरुष मी थोडाशी वाढले की माझ्या पानाची खुडणी करतात. मग मी व माझे बांधव कारखान्यात जातो वाळवणी झाली की लाकडी पेट्यात आमची रवानगी केली जाती. मग देशोदेशी प्रवास सुरू होतो. समुद्रातून, रेल्वेतून आम्ही तुमच्या सेवेला येतो. वेगवेगळ्या कंपन्यात आम्हाला आकर्षक अशा डब्यात ठेवतात. विविध रंगी, आकर्षण वेष्टण असले तरी माझा रंग एकच काळा कुळकुळीत, बारीक जाड स्वरूपात आणि दूध-साखरेच्या मिश्रणात आम्ही विलिन होतो. आमचा व्यापार करून हॉटेलवाले गबर झाले आहे. तुम्हाला उत्साह देत आमच्या जीवनाचा चोथा टाकून देता.

- मंजिरी राऊत, सहावी

सौ. विमलाबाई गरवारे प्रशाला पुणे