सच्ची गच्ची

शिक्षण विवेक    14-Apr-2023
Total Views |


सच्ची गच्ची

आली कोविडची महामारी

लॉकडाऊनचीही झाली स्वारी

कोंडूनी गेलो आम्ही घरी

रया सुट्टीची गेली सारी

शाळा नाही तरी शिक्षा

स्वच्छतेच्या अपेक्षा

आखून दिली आम्हा कक्षा

सतत कडी सुरक्षा

कोरोनाचा भलताच थाट

धुवा सारखे पाय अन् हात

हाय हाय झाला घात

संपेना महामारीची लाट

आता काय करावं?

मन कसं रमवावं?

मैदान शोधायला नवं

आता गच्चीवरच जावं

सारे एकत्र जमलो

गच्चीवर रमलो

पुन्हा खेळून दमलो

आनंदाने खुललो

गच्चीमध्येच पकडापकडी

टाकीची चढूनी शिडी

कधी मारूनी बसू दडी

आणिक तिथेच खेळू लंगडी

विस्तीर्ण तारांगण अनुभवले

उत्साहाने ग्रहण पाहिले

पावसामध्ये चिंब भिजले

निसर्गाचे चित्र चितारले

लहान मुले खेळत खेळ

आजीचा जाई मजेत वेळ

कुणी खातसे चमचमीत भेळ

जमून येई सार्यांचा मेळ

चिमणपाखरांचा थवा

आनंदाने पाहावा

उरी भरावी थंड हवा

मजेचा हा खजिना नवा

गच्चीच आनंदाची गुरूकिल्ली

तिने आम्हांला मौज दिली

सजेची वेळ मजेत गेली

इथेच नवी नाती जुळली

जेव्हा महामारी होती कोरोनाची

तेव्हा होती साथ हिची

सखी सोयरी मैत्रीण सच्ची

अशी आमुची सुंदर गच्ची !

सृजा घाणेकर

इयत्ता नववी

गोळवलकर गुरुजी विद्यालय