घर तेथे अंगण

शिक्षण विवेक    14-Apr-2023
Total Views |


घर तेथे अंगण

घर तेथे अंगण, ही संकल्पना सर्वांना माहीत असेल. ही छोटीशी संकल्पना फार काही सांगून जाते. घर म्हटलं की, अंगण येतंच. अंगणामुळेच घराची शोभा वाढते. अंगणाशिवाय घराला घरपण राहत नाही. एखाद्या छोट्याशा घरालासुद्धा मोठं अंगण केलं की, ते घर मस्त टुमदार होऊन सर्वांना आकर्षित करत असत.

सकाळच्या चहापानापासून ते रात्रीच्या चांदण्या बघण्यापर्यंत, आपला सहवास अंगणात असतो. प्रत्येकजण आपल्या मनाप्रमाणे अंगणाचा वापर करत असतो. लहान मुले खेळण्यासाठी, बायका गप्पा मारण्यासाठी, मुली झोका खेळण्यासाठी, कोणी पुस्तक, पेपर वाचण्यासाठी, तर कोणी कार्यक्रमासाठी अंगणाचा वापर करत असतो.

खरं तर, आपल्या जुन्या संस्कृतीपासूनअंगणही परंपरा चालत आलेली आहे. पूर्वीच्या काळीसुद्धा अंगणाचा वापर केला जात असे. अंगणात तुळशी वृंदावन, रांगोळी, झोका असा वापर पूर्वकालीन लोकंसुद्धा करायचे. याशिवाय जात्यावर दळणसुद्धा अंगणात बसून दळले जात असत.

प्राचीन काळापासून चालत आलेली ही परंपरा वाढत्या लोकसंख्येमुळे, तसेच जमिनीची कमतरता भासली तरी, नष्ट होणार नाही. आजही लोक बालकनी, गच्चीचा वापर करून अंगणाची कमतरता भरून काढतात. अंगणाप्रमाणेच गच्चीत तुळशी वृंदावन, झोका आणि झाडे लावतात, गप्पा मारतात. अगदी अंगण समजून वावरत असतात.

माझ्या शब्दांत सांगायचं तर, अंगण ही एकजादूची पेटीआहे. ज्याला उघडून बघावं तर, नुसत्या गंमतीच असतात. कुटुंबाबरोबर घालवलेला वेळ, नातेवाईकांसोबत केलेली मज्जा, धमाल अशाप्रमाणे आयुष्यात सर्वात ज्यास्त गंमतीचे क्षण अंगणातच घालवलेले असतात आणि त्या क्षणांची साठवण या पेटीत केलेली असते. त्या पेटीमधल्या सर्व क्षणांची साठवण या पेटीत केलेली असते. त्या पेटीमधल्या सर्व क्षणांच्या म्हणजेच, सुवर्णक्षणांच्या साठवणीचा विचार जरी केला तरी, सर्वांच्या चेहर्यावर अलगत दिसून येतो तो, आनंद...

म्हणूनच, घरातले अंगण, आनंदी साठवण!

- ज्ञानेश्वरी नंदकिशोर ढोले

शि.प्र.. मराठी माध्यम शाळा, 9वी