आमचं ‘बाया पक्षी उद्यान’

शिक्षण विवेक    19-Apr-2023
Total Views |


आमचं ‘बाया पक्षी उद्यान’

शाळेतून येतायेता एका चिमुकल्या बाळाच्या रडण्याचा. आवाज कानावर पडला. सहज वळून बघितलं, तर तो रडण्याचा आवाज एका घरातून येत होता. त्या मुलाची आई त्याला जेऊ घालण्याचा प्रयत्न करत होती; परंतु, ते बाळ जेवतच नव्हतं. शेवटी आईने एक कविता म्हणायला सुरुवात केली. ती म्हणजे, ‘चिऊताई चिऊताई, दार उघड....’ आणि आश्चर्याची गोष्ट ही की, ते बाळ आपलं रडणं थांबवून जेवू लागलं.

आपण आपल्या बालपणी काऊ-चिऊच्या गोष्टी, बडबड गीतं आणि कविता ऐकल्या आहेत. आतापर्यंत कोकीळ, कावळा, चिमणी, मोर वगैरे आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे घटक होतात. मात्र, पक्षांचं महत्त्व फक्त बडबडगीतं, गोष्टींपुरतंच सीमित नाही बरं का!! वातावरण, पर्यावरण अशा अनेक अविभाज्य घटकांमध्येसुद्धा हे छोटे जीव खूप मोठा बदल करू शकतात.

भिगवणमध्ये उजनी धरणावर बर्याच प्रमाणात रोहित पक्षी आढळतो. राधानगरीमध्ये पावसाळ्यातकाजवा महोत्सवसाजरा केला जातो. कोणी तरी आकाशातील तारे तोडून पृथ्वीवर आणले आहेत असं काजवे पाहताना वाटतं. अशी बरीच ठिकाणे आहेत जी तिकडच्या पक्ष्यांच्या विशिष्ट प्रजातींसाठी प्रसिद्ध आहेत. त्या प्रजातींचं संवर्धन, संरक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. यामुळे उद्याने महत्त्वाचे आहेत.

पक्षी आपल्या वातावरणातील एक महत्त्वाचा घटक आहे. पक्षी फुलझाडांचे परागकण आणि बियाणे पसरवतात. पक्षी मृत प्राणी आणि कीटक खातात, ज्यामुळे पर्यावरण स्वच्छ व निरोगी राहतं. विद्यार्थ्यांना पक्ष्यांचं निरीक्षण करण्याची संधी, निसर्गामध्ये रममाण होण्याची संधी मिळावी या हेतूने आमच्या शाळेनेबाया पक्षी उद्यानसुरू केलं आहे. या उद्यानाच्या माध्यमातून पक्ष्यांचं महत्त्व आणि त्यांची माहिती मिळवणं आता खूप सोपे झालं आहे. उद्यानाच्या आवारात शांत सावली, मनोहर फुले, घनदाट झाडी, पक्ष्यांचा मंजुळ किलबिलाट व रंगीबिरंगी चित्रे आहेत. पक्ष्यांसाठी राळे, ज्वारी असे बरेच पौष्टिक खाद्यपदार्थ ठेवले आहेत.

महर्षी कर्वे यांच्या जयंतीचं (18 एप्रिल) औचित्य साधून पक्षितज्ज्ञ डॉ. संजीव नलावडे यांच्या हस्तेबाया पक्षी उद्यानाचेउद्घाटन झाले. या उद्यानातचेीरळल ढळश्रशीने गुंजन पक्षी, गाणारा पक्षी, सुतार पक्षी, मोर, रंगीत पक्षी, गरुड, नीलकंठ, धनेश, रोहित या 12 पक्षांची चित्रे तयार केली आहेत. या उद्यानाचं नाव मला सर्वांत जास्त आकर्षित करतं. ‘बायाहे नाव महर्षी अण्णांच्या अर्धांगिनीचे आहे, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे, तसंचबायासुगरण पक्षालाही म्हणतात. आपल्या अण्णांनी आपली शाळा, संस्था उभी केली. कालांतराने संस्थेतील विद्यार्थी आणि शिक्षकांची संख्या वाढत गेली. बायांचासुद्धा या उपक्रमाला मोठा हातभार होता. सुगरण पक्षी जसं आपलं घरटं काडीकाडी गोळा करून स्वतःच्या चोचीने विणत जातो. त्याचप्रमाणे आपली संस्था बायांनी स्वतःच्या विचारांनी आणि हातांनी विणली आहे, असं म्हणायला हरकत नाही.

बाया पक्षी उद्यानामध्ये घनदाट झाडी आहे. झाडांवर पक्षांचे खाद्यसुद्धा ठेवले आहे. पक्षांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात आनंदी ठेवण्याची कल्पना मला फारच भावली. बाया पक्षी उद्यानात आपल्याला शाळेच्या आवारातील झाडांची संख्या असलेल्या तक्ता दिसतो. शाळेच्या परिसरात लावलेल्या तब्बल शंभर झाडांची नावे आणि झाडांची संख्या तक्त्यात दर्शवली आहे. एका मातीच्या भांड्यात पाणी ठेवून त्यावर आडवी काठी ठेवली आहे. त्यामुळे तप्त उन्हाळ्यातदेखील पक्ष्यांना थंड पाण्यात आंघोळ करता येते. विविध रंगांच्या फुलांमुळे बागेत रंगबेरंगी दागिने असल्याचा भास होतो. घरटी, पक्ष्यांची चित्रे, आकाशकंदील वगैरे गोष्टी बागेच्या सौंदर्यात भर घालतात. पक्ष्यांची माहितीदेखील खूप मनोरंजक आणि सोप्या पद्धतीने दिली आहे.

गुंजन पक्षी एका सेकंदात 55 वेळा पंखांची फडफड करतो. गाणारा पक्षी पूर्णतः शाकाहारी असतो. रंगीत पक्षी माणसांची नक्कल करू शकतात. गरुडाचे डोळे त्याच्या मेंदूपेक्षा मोठे असतात. आकाराने सर्वांत लहान ते सर्वांत मोठा पक्षी यांपासून ते पोहणार्या, उडणार्या, पळणार्या पक्षांपर्यंतची माहिती या उद्यानातून समजते. बाया पक्षी उद्यानातून पक्ष्यांना आणखी जवळून जाणून घेण्याची संधी मला मिळाली. मी आता पक्षांच्या संवर्धनात खारीचा वाटा उचलू लागले आहे. गच्चीवर भरपूर पाणी, ज्वारी ठेवून पक्षांना बघण्याची संधी शोधत असते. माझा हा उपक्रम बघून माझे मित्र, नातेवाईक, शेजारीसुद्धा असं करू लागले आहेत. आपणही आजपासून, नव्हे अगदी आतापासून पर्यावरणसंवर्धनासाठी, पक्ष्यांसाठी आपल्या गच्चीवर पाणी आणि धान्य ठेवण्याचा संकल्प करू या आणि पक्ष्यांना दिलासा देऊ या.

- सई सोनटक्के, 7 वी,

व्हिजन इंग्लिश मीडिअम स्कूल, नर्हे