बालकाचे मन

शिक्षण विवेक    21-Apr-2023
Total Views |


बालकाचे मन

आज शाळेला सुट्टी लागली

मला तर काय मज्जाच आली.

मनात विचार करु लागलो

की हे करू का ते करू?

मैदानात जाऊन खेळ खेळू

की बागेत जाऊन घसरगुंडी खेळू

की बागेत नुसत्या फेर्याच मारू

नदीवर जाऊन मनसोक्त डुंबु

की पाण्यात नुसत्या नावा सोडू

झाडावरचे पक्षी मोजू

की झाडावरची फळे मोजू

मित्राच्या घरी पत्ते खेळू

की नुसतेच बसुन मज्जा बघु

मावशीकडे जाऊन भावाबरोबर

लपंडाव खेळू की मावशीची

बाहुलीसारखी दिसणार्या मुलीशी खेळू की

तब्ल्याचा क्लास लावू की

पेटीला प्राधान्य देऊ की

गिटार वाजवू की सतार वीणा छेडू की

फुटबॉल खेळू की लरवाळपींेप ची रॅकेट पकडू की

खो खो खेळू की लंगडी घालू की

बुद्धिबळ खेळू की सारीपाट मांडू

की सापशिडी खेळू की भोवराच फिरवू.

या सगळ्या विचारांच्या नादात

खेळायचे सारे राहूनच गेले

आणि सुट्टी मात्र संपून गेली

- विमल पाटील, पालक,

मा.. गोळवलकर गुरूजी विद्यालय, पुणे