निसर्ग

शिक्षण विवेक    28-Apr-2023
Total Views |


निसर्ग

निसर्ग आमचा सोबती

त्याचे गुण गाऊ संगती

निसर्गात असतो फळ-फुलांचा मळा

निसर्गात भरते रोज पक्ष्यांची शाळा

निसर्गाचे ऋण आहेत किती

मोजू शकत नाहीत माणसे इतकी

निसर्ग आपल्याला देतो प्राणवायू

त्याचे हे उपकार मी कसे सांगू?

निसर्गाची माया वेगळीच

जशी ती आई आपलीच

तिचे आपल्याशी नाते आईचे

भरवते ती घास प्राणवायूचे

- सायली बनवरे,

कै. नाना पालकर प्रा.वि. नांदेड