ई-शिक्षण काळाची गरज

शिक्षण विवेक    29-Apr-2023
Total Views |


ई-शिक्षण काळाची गरज

काल शिकवत होतो, तसेच आजही शिकवत राहिलो तर आपण आपल्या मुलांपासून त्यांचा भविष्यकाळ हिरावून घेऊ, असे जॉन ड्युई या थोर शिक्षनविचारवंताचे विचार आजच्या कोरोनाच्या संकटकाळीही योग्य वाटतात. आज शिक्षण क्षेत्रात सगळीकडे ई-शिक्षण याचा झंझावात पसरला आहे.

-शिक्षण म्हणजे वर्गअध्यापनात माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून वापरण्यात येणारी आधुनिक शिक्षणपद्धती असे शिक्षणाच्या दर्जात सुधारणा घडवणारी आणि विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाच्या पलिकडे नवीन माहिती देणारी ही आनंददायी शिक्षणपद्धती आहे. -शिक्षण साधनांमध्ये मोबाईल, रेडिओ, दूरचित्रवाणी, डीव्हीडी क्लिप्स, ब्लॉग, पीपीटी स्लाइडस्, एज्युकेशनल सॉफ्टवेअर, थ्रीडी मॉडेल, वेबसाईटस् यांचा समावेश होतो. -शिक्षणामध्ये परस्परसंवादी मल्टीमिडीया व्हिडीओ धडा आणि टचस्क्रीन पेनचा वापर करून प्रोजेक्टर पडद्यावर अध्यापन करता येते. शिक्षक स्वत: पाठाचे प्रेझेंटेशन तयार करून अध्यापन करू शकतात. -शिक्षण तंत्रज्ञान शिक्षक आणि विद्यार्थी यांना हाताळण्यास सोपे आहे. सध्याच्या जमान्यात सर्वच क्षेत्रात संगणकाचा वापर आनिवार्य ठरतो आहे. शिक्षणक्षेत्रही त्याला अपवाद नाही. मुले संगणक हाताळू लागल्यामुळे त्याच माध्यमातून त्यांना वेगवेगळे शिक्षण देण्याचे प्रयत्न होत आहेत. यालाच ई-शिक्षण म्हणता येईल.

-शिक्षणाने नोकरी करणे सोयीस्कर झाले आहे, संगणकाद्वारे मिटींग घेणे, पीडीएफ करणे हे सोपे झाले आहे. घर बसल्या महत्त्वाची सगळी कामे होतात. कोणी आजारी असला तर तो ऑफिसमध्ये प्रत्यक्ष उपस्थित न राहता त्याचे कर्तव्य पार पाडू शकतो. जी मुले दिल्लीत राहत नाहीत ते सुद्धा दिल्लीत होणारे सी.. चे क्लासेसला ऑनलाईन उपस्थित राहू शकतात. ऑक्सफर्ड विद्यापीठ होणारे वर्ग भारतात व जगातल्या दुसर्या भागात राहणारे विद्यार्थी उपस्थित राहू शकतात आणि तिथली पदवी मिळवू शकतात. हे सगळे फक्त ई-शिक्षणाने शक्य झाले आहे.

आता ई-शिक्षणामुळे घर बसल्या शिक्षण आणि ऑफिसमधले काम होत असल्याने लोकांची घराबाहेर ये-जा करण्याची संख्या बर्याच प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुले वाहनांचा वापर कमी झाला आहे. ह्या सगळ्यामुळे नकळत वायू प्रदुषण, ध्वनी प्रदुषणात घट होत आहे. हरीतवायूचे प्रमाण कमी झाले. ऑनलाईन शिक्षण घेत असल्याने फळा, लाकडी बाक बनवण्याची संख्या कमी झाली आहे, म्हणून झाडे त्यातल्या त्यात कमी प्रमाणात कापले जात आहेत. जी लोकं पांगळी आहेत व दूर प्रवास करणे ज्यांना शक्य नाही त्यांना ई-शिक्षणाचा सर्वात मोठा फायदा झाला आहे. कोडींगद्वारे अनेक उपकरणे बनवली जात आहेत. ज्यामुळे आंधळे, मुकबधिर, पांगळ्या लोकांना जणू काही नवीन आयुष्य लाभले आहे. माझ्या मते ई-शिक्षणाचा हा सर्वात मोठा फायदा आहे.

प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. तसेच ई-शिक्षणाचे जसे फायदे आहेत तसेच तोटे पण आहेत.

-लर्निंगचे माध्यम निवडणे महत्त्वाचे आहे. कोणते माध्यम आणि साधने, त्याच्या मर्यादा, उपलब्धता यांचा विचार करावा लागतो. युट्यूबवर आज सर्व काही उपलब्ध आहे; पण त्यातील आशय, भाषा, मांडनी ही आपल्या विद्यार्थ्यांच्या वयोगटासाठी योग्य आहे का? त्यात किती सत्य आहे? याची पडताळणी करणे आवश्यक आहे.

वर्ग अध्यापनात वर्गातील आंतरक्रिता महत्त्वाची भूमिका बजावते. ऐकणे, बोलणे या शाब्दिक आंतरक्रिया तर हावभाव देहबोली या अशाब्दिक आंतरक्रिया होय. त्याचे स्वरूप ऑनलाईन वर्गात बदलते. विद्यार्थी-शिक्षकांमधील समोरासमोरचे परस्परसंवाद होत नाहीत त्यामुळे मुलांना किती समजले आहे याची कल्पना शिक्षकांना येत नाही. मुले ई-शिक्षणाच्या जगात असल्याने ते खर्या आयुष्यात संवाद साधत नाहीत.

ह्याच बरोबर ई-शिक्षणाचे शारीरिक व मानसिक तोटेही आहेत. जास्त वेळा स्क्रिनसमोर बसल्याने डोळे खराब होतात. एकाच स्थितीते बसल्याने पाठीचा मणका खराब होतो. -शिक्षणात विद्यार्थी मैदानावर जाऊन प्रत्यक्ष खेळत नाही, यामुळे त्यांचे वजन वाढते आणि ते अनेक रोगांना निमंत्रण देतात. त्यांना स्क्रीनसमोर बसायची सवय लागते व ते बाहेर खेळायला जायला, निसर्गात जायला टाळाटाळ करतात. हे सगळे शारीरिक तोटे झाले. मुलांची मानसिकता ही इंटरनेट पर्यंत सीमित राहते व त्यांना बाहेरच्या जगाचा सामना करायला अवघड जाते. मुलांच्या स्मरणशक्तीवर परीणाम होतो. त्यांच्या विचार करण्याच्या क्षमतेत घट होते व ते सगळी उत्तरे ऑनलाईन मिळतील या भरोश्यावर राहतात.

ग्रामीण भागात जेथे इंटरनेट नाही, मोबाईल नाहीत तेथे ई-शिक्षण शक्य नाही. जी कुटुंब गरीब आहेत त्यांना मोबाईल, टी.व्ही घेणे शक्य नाही. जरी शासनाने टीव्हीवरील ई-शिक्षणाच्या वाहिन्या सुरू केल्या असल्या तरी प्रत्येकाच्या घरी टी.व्ही असतो असे नाही.

ह्या सगळ्या गोष्टींवरून असे लक्षात येते की कशाचा ही अतिरेक वाईटच असतो. म्हणून आपण हे ठरविले पाहिजे की आपल्यासाठी काय योग्य आहे.

- साक्षी मोहिते, 9 वी,

spm