पितृहृदय

शिक्षण विवेक    29-Apr-2023
Total Views |


पितृहृदय

श्याम नावाचा एक मुलगा वडगाव नावाच्या छोट्या गावात राहात होता. श्याम चौथीत शिकत होता. त्याची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. त्याचे वडील शेतकरी होते. तो दोन दिवसांच्या सुट्टीसाठी मामाच्या गावाला जाणार होता. त्याकाळी बैलगाडी हेच प्रवासाचे साधन होते. श्यामकडे बैलगाडी नव्हती. त्यामुळे तो वडिलांसोबत चालत जाणार होता. मामाचे गाव वीस किलोमीटर होते. श्याम व त्याचे वडील चालत निघाले. वाटेत रात्र झाली. पाऊस पडत होता. वाटेत एक मंदिर होते. ते दोघे त्या जवळच्या मंदिरात गेले. रात्र खूप झाली होती.

वडील म्हणाले, ‘श्याम जेवून घे.’ श्यामहोम्हणतो व डबा खातो. डबा खात असताना तो वडिलांना विचारतो, ‘तुम्हीसुद्धा खाऊन घ्या.’ वडीलनकोम्हणतात. श्याम सगळा डबा खाऊन टाकतो व झोपतो. पाऊस पडत असल्यामुळे थंडी खूप असते. श्यामच्या वडिलांनी श्यामला पांघरूण दिले. पांघरूण घेतल्याबरोबर त्याला गाढ झोप लागली; पण त्याचे वडील थंडीत कुडकुडत झोपले होते. सकाळी झोपेतून उठल्यानंतर श्यामला कळते की, वडील थंडीत झोपले आणि त्यांनी आपले पांघरूण त्याला दिले. ते जेवलेही नाहीत. वडीलही आईसारखेच प्रेम करत असतात. हे पहिल्यांदाच श्यामला कळाले होते. या विचारातच तो मामाच्या गावची वाट चालत राहिला. त्याला वडिलांची माया अधिक जवळून कळत होती.

- प्रणव दत्तात्रेय घोलप, इयत्ता 4 थी,

नूतन मराठी विद्यालय, सोलापूर