स्त्री : ईश्वराची सर्वोत्तम कलाकृती

शिक्षण विवेक    16-May-2023
Total Views |


स्त्री : ईश्वराची सर्वोत्तम कलाकृती

स्त्री ही परमेश्वराने घडवलेली सर्वोत्तम कलाकृती आहे. स्त्री म्हणजे मुदृता आणि कठोरता, कष्ट आणि माधुर्य, कणखरपणा आणि हळवेपणा, संयम आणि चिकाटी, जिद्द आणि धडाडी, नियोजन आणि कृती, सौंदर्य आणि बुद्धी या साऱ्यांचे प्रतीक. ती एकाच वेळी वेगेवेगळी नाती लीलया सांभाळते.

मुलगी जन्माला येते, तेव्हा ती आई-बाबांची ‌‘पहिली बेटी, धनाची पेटी' असं म्हटलं जातं. आईची ती परिराणी असते. बाबांची मायेची लेक असते. मोठी होऊन आईची मैत्रीण, तर वडिलांसाठी जबाबदारी घेणारी, सेवा करणारी, मायेने संभाळ करणारी जाणती स्त्री होते. घरादाराचं सोज्वळपण, पावित्र्य, संस्कृती सारंसारं ती जपते. दीर्घ काळापासून काहीशी दुर्लक्षित राहिलेली स्त्री आता बदलत्या काळानुसार बदलते आहे. काही काळापूर्वी स्त्रीला चुल आणि मुल या मर्यादांमध्ये अडकवून ठेवण्यात धन्यता मानणारा समाज होता. मात्र, आता समाजसुधारणा झाली. लोकांच्या विचारसरणीत बद्दल होत गेला. स्त्रियांनी मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने केले. स्त्रियांनी मनापासून ठरवलं, तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही हे त्यांनी दाखवून दिलं. नवनवीन आव्हाने स्त्रीने समर्थपणे पेलली.

खेळ, संगीत, नृत्य, लेखन, राजकारण, अशा सर्वच क्षेत्रात स्त्रियांनी आपला ठसा उमटवला आहे. स्त्रियांनी आपली मोहोर उठवली नाही, असं एकही क्षेत्र नाही. रेल्वेचालक, पायलट, पोलिस दल यांसारख्या धाडसी जबाबदाऱ्याही स्त्री पेलताना दिसते. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी, न्यायाधिकारी यांसह विविध प्रशासकीय जबाबदाऱ्यादेखील ते पार पाडताना दिसेत. ती स्त्री आहे म्हणून ती असमर्थ किंवा कमी ताकदीची आहे, असा विचार कोणीही करता कामा नये.

नारी ‌‘शक्ती' आहे, नारी ‌‘मुक्ती' आहे, नारी एक मार्ग आहे संपन्नता आणण्याचा आणि नारी आरसा आहे, देशाच्या प्रगतीचा.

स्त्रीला समजून घेऊन तिला फक्त लढ म्हणण्याची गरज आहे. त्यामुळे ईश्वराच्या या सर्वोत्तम कलाकृतीचा सन्मान आपण सर्वांनी करायलाच हवा.

- श्रेया संतोष खेसे

..सो. चे वाघिरे विद्यालय