झाड

शिक्षण विवेक    16-May-2023
Total Views |


झाड

परवा मी झाडाला

मारला एक दगड

बाबा म्हणाले आईला,

‌‘ह्याला खूप बदड.'

झाडाला असं कधी

दगड कोणी मारतं का?

झाडाला लागलं, तरी

झाडं कधी बोलतं का?

दगड मारतासुद्धा

झाड खूप काही देतं

उन्हामध्ये सावली आणि

फळेसुद्धा देतं !

झाडांशिवाय आपल्याला

ऑक्सिजन कोण देणार?

झाडांवरच्या चिमण्या

सांगा कोठे बरं राहणार?

झाडांची काळजी बाळा

आपण सारे घेऊ

रोज सकाळी झाडांना

थोडं पाणीसुद्धा देऊ !

आता कळलं बाळा,

झाड किती शहाणं असतं

आपल्या सर्वांसाठी ते

दिवस-रात्र उभं असतं....!

- सुजित कदम, पालक

सौ. विमलाबाई गरवारे प्रशाला, पुणे