घरकुल

शिक्षण विवेक    22-May-2023
Total Views |


घरकुल

घरकुल संस्कारांचे ।

परिपूर्ण विचारांचे ॥

प्रेम पाया हा घराचा ।

एकत्रित कुटुंबाचा ॥

मनी नको अहंकार ।

ध्यानी राहोत उपकार ॥

नातीगोती जपू सारी ।

माणुसकीचे धन भारी ॥

शांतता नांदे लक्ष्मीसवे ।

प्रसन्नता नित्य तिथे ॥

ताठपणा वैरी खरा ।

गोड शब्द बोलू जरा ॥

विचारांची शिकवणी ।

करू सारे उजळणी ॥

परिवार राहे सुखी।

समाधान दिसे मुखी ॥

- पूजा ओमकार कुंटे, पालक,

न्या. रानडे बालक मंदिर, पुणे