आई

शिक्षण विवेक    26-May-2023
Total Views |


आई

आई तुझ्या आठवणीने

कंठ दाटून आला

तुझ्या हातचा बनवलेला

जेव्हा डब्बा मी खाल्ला

प्रत्येक घासागणिक

आठवण आली

कारल्याची भाजीसुद्धा

गोड झाली

घास घालताना तोंडात

डोळे भरून आले

जणू आमटीतून

मी अमृत प्याले

जगात नाहीस

असं कळलं

साऱ्या जगासमोर

ओक्साबोक्शी रडले,

आज जेवताना

गळ्यात घास अडकला

आठवणीच्या पाण्याबरोबर

तो तसाच गिळला

डब्बा संपत आला तरी

आठवण सरत नव्हती

आई तुझ्या वात्सल्याची साखर

आज विरघळत नव्हती

- शर्वरी जितेंद्र सावध, 4 थी,

श्री सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालय, माजलगाव