असे शिक्षण हवे मला

शिक्षण विवेक    31-May-2023
Total Views |


असे शिक्षण हवे मला

अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारे

अपयशात यश शोधायला लावणारे

गर्दीत माणसांच्या माणुसकी जपणारे

असे शिक्षण हवे मला 1

पुस्तकांचे ओझे नव्हे तर मैत्री देणारे

नुसती पोपटपंची नसून खरे ज्ञान देणारे

प्राण्त ज्ञानाचे उपयोजन शिकवणारे

असे शिक्षण हवे मला॥2

कागदावरील मार्कांना नव्हे नॉलेजला प्राधन्य देणारे

हितकारी जुन्या संस्कृतींचा वारसा जपणारे

समाज्याच्या कु-प्रथांना बदलणारे

असे शिक्षण हवे मला॥3

देशाचा उत्तम नागरिक बनवणारे

शालेय परीक्षेबरोबरच जीवनाच्या परीक्षेत जिंकवणारे

विद्येचा व्यापार नव्हे तर दान करणारे

असे शिक्षण हवे मला॥4

- श्रद्धा रमेश्वरजी शर्मा

10वी

श्री सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय, माजलगांव