मला काय हवंय

शिक्षण विवेक    31-May-2023
Total Views |


मला काय हवंय

काही नाती ना किचनच्या एका कोपऱ्यात जपून

ठेवलेल्या लोणच्याच्या बरणीसारखी असतात.

जिला कितिही जपलं, सवरलं तरी कधीतरी ती

हातातून निसटतेच.

मग कारण भले काहीही असो,

कधी बरणीवरची पकड सैल झाल्यामुळे असो की,

स्वत:च्याच हलगर्जीपणामुळे असो,

शेवटी मग बरणी हातातून निसटल्यावर उरतो फक्त

तुटलेल्या काचांचा पसारा

काही नात्यांचं ही अगदी तसंच असतं.

त्यांना कितीही सवरण्याचा प्रयत्न केला तरी ती

कधीतरी तुटतातच

मग कारण भले काहीही असो,

कधी गैरसमजामुळे, तर कधी परिस्थितीमुळे

आणि शेवटी नातं तुटल्यावर उरतात त्या

विखुरलेल्या आठवणी

- अनिकेत अनंत जाईलकर

7वी

अभिनव ज्ञान मंदिर उसर खुर्द