जीवन

शिक्षण विवेक    04-May-2023
Total Views |


जीवन

एक होता लाकूडतोड्या. त्याचं नाव होतं रमेश. एकदा तो एका छान शेताजवळ असलेल्या मोठ्या झाडाखाली बसला. रमेश खूप थकल्यामुळे त्याला वाटलं की, 10 मिनिटं आराम करू या. थोडा वेळ त्याने आराम केला. मग रमेश उठल्यावर त्याला वाटलं, की संध्याकाळ होत आली. त्यामुळे झाड पटापट कापावं लागले, असं तो स्वतःशी म्हणाला.

मग त्याने उठून झाड कापायची तयारी केली. तो झाड कापू लागला. तेवढ्यात एक आवाज आला. ‘अहो दादा, नको नको, थांबाऽऽ’’ रमेशने बघितलं, तर एक दादा आला आणि त्याने रमेशचे हात धरले. त्याने विचारलं,‘तुम्ही कोण दादा?’ दादा म्हणाला, ‘मी गोपाळ, या शेताचा मालक. तुम्ही एका जीवाला मारत आहात, काय हो? एक माणूस असून, तुम्ही असं करता?’ रमेश म्हणाला, ‘मी? नाही हो. मी नाही कोणाला मारत.’

गोपाळ म्हणाला, ‘मी पाहत होतो, तुम्ही आलात. झाडाखाली आराम केला. उठून मग त्याच झाडाला कापायची तयारी केलीत. जर तुम्ही आल्यावर सावली द्यायला हे झाड नसतं, तर तुम्हाला उन्हात बसावं लागलं असतं. झाड एक जीव आहे व त्याला तुम्ही ठार मारत आहात.’ हे म्हटल्यावर रमेशने केलेली चूक त्याला लक्षात आली.

रमेशने विचारलं, ‘तुम्ही म्हणाला की, या शेताचे मालक तुम्ही आहात, मग मी तुमच्यासोबत शेती करू का?’ गोपाळहोम्हणाला. आणि त्या दिवसापासून रमेश आणि गोपाळ शेती करू लागले.

- लक्ष्मी नायर,

व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल, नर्हे