अवयवांवर आधारित मराठी म्हणी

शिक्षण विवेक    05-Jun-2023
Total Views |


अवयवांवर आधारित मराठी म्हणी

1. एका हाताने टाळी वाजत नाही

2. अंथरूण पाहून पाय पसरावे

3. नाकापेक्षा मोती जड

4. आपलेच दात आणि आपलेच ओठ

5. उचलली जीभ लावली टाळ्याला

6. आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे

7. हसे लोकाला आणि शेंबुड आपल्या नाकाला

8. हाताच्या कंकणाला आरसा कशाला

9. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग

10. बळी तो कान पिळी

11. कानामागून आली आणि तिखट झाली

12. ओठात एक आणि पोटात एक

13. अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का

14. हात दाखवून अवलक्षण

15. ज्याच्या हाती ससा तो पारधी

16. हात ओला तर मित्र भला

17. पायाची वहाण पायातच बरी

18. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात

19. तोंड दाबून बुक्क्‌‍यांचा मार

20. नाक दाबले की तोंड उघडते

21. आपली पाठ आपल्याला दिसत नाही

22. आधी पोटोबा मग विठोबा

23. गळ्यातले तुटले ओटीत पडले

24. कानात बुगडी गावात फुगडी

25. दोन डोळे शेजारी भेट नाही संसारी

26. काखेत कळसा आणि गावाला वळसा

27. अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन जाईल पळ

28. आपला हात जगन्नाथ

29. आड जीभ खाली आन पडजीभ बोंबलत जाई

30. झाकली मुठ सव्वा लाखाची

संकलन - तन्वी मूल्या, 8वी

व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल, नऱ्हे., पुणे