पाऊसर

शिक्षण विवेक    05-Jun-2023
Total Views |


पाऊसर

ये पाऊसा, ये पाऊसा

तुला हाक कसे मारायचे

ना कळे मला,

तू केव्हा पण येतोस,

आणि केव्हा पण जातोस,

समजत नाही मला.

ज्या लोकांना गरजेचे पाणी,

त्या लोकांना का ऐकवतोस बिजलीची वाणी,

ज्या गावात मिळत नाही पिण्याचे पाणी,

त्या गावात तुझी का होते वनवाणी |

‌‘'जेव्हा शेतकरी पाहतो तुझ्या आगमनाची वाट,

त्या शेतकऱ्यांना दाखवतोस तू आपली पाठ”,

‌‘ज्या गावातल्या लोकांना माहिती नव्हतं होणार काय आज

तू तिथं जाऊन लाऊन टाकली त्यांची वाट,

शेतकऱ्याला दाखवतोस येण्याची दृश्य,

पण का होतोस अचानक अदृश्य,

‌‘शेतकरी करतात मेहनतीची कामे,

तू अचानकपणे येऊन फिरवतोस त्यावर पाणी,

म्हणून पाऊसाचे कसे मानावे ऋण”.

समजत नाही मला.

- आश्लेषा सोळंके, 10 वी,

श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालय, अंबाजोगाई,