बाबा हरभजन सिंह

शिक्षण विवेक    13-Jul-2023
Total Views |


बाबा हरभजन सिंहबाबा
हरभजन सिंह यांचा जन्म 30 ऑगस्ट 1946 रोजी गुजरावाला येथे झाला. हरभजन सिंह 1966 पंजाब येथील सेनात भरती झाले. थोड्या दिवसांनी त्यांची बदली भारत-चीन सीमेवर तुला येथे झाली. लोक बोलतात की, त्यांचा मृत्यू झाला, तेव्हा त्यांचा पाय घसरून एका नदीत पडले. पाण्याच्या वेगामुळे, घटना स्थळावरून दोन किलोमीटर लांब त्यांचे शरीर जाऊन पडले. त्यांना शोधायचा खूप प्रयत्न केला, पण ते भेटले नाही. सेनेला वाटले की, ते पळाले. म्हणून सेनेने घोषित केले की, ते पळाले. थोड्या दिवसांनी त्यांच्या एका मित्राच्या स्वप्नात ते आले आणि सांगितले की, त्यांच्या शरीर आणि रायफल कुठे आहे. पुढच्या दिवशी एक तुकडी त्या जागेवर गेली आणि त्यांना त्या जागेवर त्यांचे शरीर आणि रायफल दिसले. सेनेला त्यांची चूक कळाली होती. त्यांनी बाबा हरभजन सिंह यांना सन्मानाने अंतिम संस्कार केले. थोड्या दिवसांनी ते परत एका सैनिकाच्या स्वप्नात आले आणि सांगितले की, माझे शरीर सोडले. पण माझा आत्मा अंतिम सीमेवर काम करत राहील. पण हे कोणी गंभीरपणे घेतले नाही. थोड्या दिवसांनी असं घडलं की, कोणासोबत ही काही बरं वाईट किंवा विचित्र घडणार असेल, तर ते एक दिवस आगोदर येऊन ते सांगायचे. ही गोष्ट फक्त भारतात जात नाही मानत. चीन सुद्धा मानते. चीनचे का सिनिअर ऑफिसरनी भारतीय सैनिकाला सांगितले की तुम्ही, तुमच्या एका सैनिकाला परत बोलून घ्या. तो रात्री एका पांढऱ्या घोड्यावर बसून सीमेचे वेढे घालत असतो. पुढच्या दिवशी एक तुकडी त्या जागेवर गेली आणि तिथे त्यांना एका घोड्याच्या पायाचे ठसे दिसले. बाबा हरभजन सिंह यांची दोन मंदिरं आहेत एक जुने बाबा मंदिर आणि दुसरे नवीन बाबा मंदिर. यातून आपल्याला असे शिकायला पाहिजे की, बाबा हरभजन सिंह यांच्यामध्ये अपार देशभक्ती होती. मृत्यू नंतरसुद्धा ते आपल्या देशाचा आत्मा बनून रक्षण करत आहेत.

- श्रवण भोकसे, 7वी,

व्हिजन इंग्लिश मेडीयम स्कूल, पुणे.