स्वयंपाक घरातील दुनिया

शिक्षण विवेक    14-Jul-2023
Total Views |


स्वयंपाक घरातील दुनिया

स्वयंपाक घरातील दुनिया ही जादूचीच आहे. असा एकही दिवस जात नाही, ज्या दिवशी आपण स्वयंपाक घरात डोकावत नाही. आपणास स्वयंपाक घरात गेल्याशिवाय करमत नाही. आज आईने खायला काय केले आहे? याची तर मला खूपच उत्कंठा असते.. तुम्हाला असते का नाही? आता खाण्याचा विषय निघालाच आहे, तर चला अन्नाविषयी थोडीशी माहिती मिळवू या.

अन्न हे आपल्या शरीरासाठी एक महत्त्वाचा घटकच आहे. अन्न ग्रहण करायला हवे, पण ते जर पौष्टिक नसेल तर त्याचा काय फायदा? पौष्टिक अन्न खायला पाहिजे जसे ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, भात, वरण, पोळी-भाजी . पण आताच्या काळात हे पौष्टिक पदार्थ तर लोक विसरूनच गेले आहेत. आता तर पिझ्झा, बर्गर, सॅन्डविच यांसारखे पदार्थ खाल्ले जातात. हे पदार्थ फक्त चवीस चांगले लागतात. पण शरीरास हवे असणारे पौष्टिक घटक मिळत नाहीत. आवश्यक असणारे घटक जर आपल्या शरीरास मिळाले नाहीत, तर आपण विविध आजारांना बळी पडतो. पौष्टिक अन्नामध्ये हिरव्या पालेभाज्यात जसे मेथी, पालक तसेच कारले, दोडका, टोमॅटो, बटाटा . अश्या विविध प्रकारच्या भाज्या असतात. मात्र या भाज्या, शिवाय कडधान्य खाणे, हिरव्या भाज्या खाणे हे महत्त्वाचे आहे. पण आजच्या काळात भाज्या उगवण्यासाठी, विविध प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर करतात. रासायनिक खतांमुळे आपले आरोग्य धोक्यात आले आहे. पूर्वीच्या काळी गांडूळ खत, शेणखत यांसारख्या नैसर्गिक खतांचा वापर केला जायचा. यामुळे पूर्वीचे लोक अगदी तंदुरुस्त असायचे. पण आताचे लोक तसे निरोगी पाहायला मिळत नाही. आताच्या पिढीतील लोकांची प्रतिकारशक्ती खूप कमी झाली आहे. उदाहरण म्हणजे कोरोना महामारी. या महामारीमुळे कित्येक लोक बळी गेले. आपल्याला चांगले आणि पौष्टिक अन्न खायला हवे, हे तर आता मला समजले आहे. मी आता कोणतीही भाजी खाण्यासाठी नाही म्हणणार नाही. आतापासून मी सर्व भाज्या आणि कडधान्य खाणार आहे. तुम्ही खाणार आहात का नाही? तुम्हीही खा बरं का. चला तर मग स्वयंपाक घरातील दुनियेशी मैत्री करूया आणि सर्व आनंदी आणि निरोगी राहू या.

- तेजल खेञे, 8 वी,

श्री. सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय, माजलगाव