गंमत...

गंमत...

शिक्षण विवेक    15-Jul-2023
Total Views |


गंमत...

स्वयंपाक घरात नेहमीच चालू असते खुडबुड

प्रत्येक पदार्थ करत असतो लुडबुड

प्रत्येक वस्तू घडवते एक वेगळीच गंमत

कधी कधी लागते आमचीही संगत 1

सर्वात पहिली पाळी दुधाची असते

आई मला त्याच्याकडे लक्ष द्यायला लावते

तेव्हाच दुसरी गोष्ट माझं लक्ष वेधून घेते

तेवढ्यात दूध त्याच्या सर्व मर्यादा पार करते

स्वयंपाक घरातल्या कांद्याला म्हटले जाते हिटलर

त्याला बघून रडतं पूर्ण घर

पदार्थाच्या चवीत मात्र तोच घालतो भर

कोणत्याही गोष्टीत ठेवत नाही कसर

वेगवेगळ्या गोष्टींची वेगवेगळी गंमत

वेगवेगळ्या गमतींनी जीवनाला येते रंगत

या गमतींना लागते आईच्या मायेची संगत

गमतींतून बनलेल्या पदार्थांनी खूष होते पंगत

- अवनी गायकवाड, 8 वी

कन्याशाळा, वाई