वडील

वडील

शिक्षण विवेक    20-Jul-2023
Total Views |

 वडील

आजकाल जमान्यात

फक्त आईच दिसते

पण राबराब राबणारा

बाप कोणालाच दिसत नाही.

चार भिंतींच्या आत

असते आई तिच्या

पुढे बापाचं काहीच

चालत नाही.

आई असते नटलेली

नव्या कपडयात सजलेली

बाप जुन्या कपड्यात

त्याची कोपरी फाटलेली.

बाप घर चालवतो

सगळे खातात पोट भर

तो बाप उपाशी झोपतो

तो बाप उपाशी झोपतो.

- समृद्धी वीर, 7 वी,

आर्य चाणक्य विद्या मंदीर पैठण