बालपणीचे ते क्षण
एक अनोखी आठवण ...
ना होता आभ्यास
नव्हता कोणता ध्यास...
गेले दिवस त्या मैदानी खेळांचे
आता आहे जग ऑनलाइनचे...
जसे होत गेलो मोठे
विश्व झाले खोटे...
लहानपणी होते मैदानी खेळ
आता कळेना डिजिटल मेळ...
मोबाईल नव्हता हाती
आता आहे तंत्रा संगती
खरच शाळेत होती मज्जा फार
घरी होता आईचा मार
शाळेत जात होतो पाई
आत्ता मात्र बाईक हाती
बालपणीचे ते क्षण
एक अनोखी आठवण
अपर्णा कातारे, 10 वी
श्री सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय, माजलगाव