श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात शिक्षण विवेक वर्धापन दिन साजरा
अंबाजोगाई : श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात भारतीय शिक्षण प्रसारक संस्था विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या लेखन कौशल्य विकसित व्हावे म्हणून शिक्षण विवेक मासिक अंक चालविते ९ ऑगस्ट हा शिक्षण विवेक अंकाचा वर्धापन दिन आहे मा मुख्याध्यापक श्री बाबूराव आडे यांच्या मार्गदर्शना नुसार पर्यवेक्षक श्री अरुण पत्की , शिक्षण विवेकचे संपादक प्रतिनिधी श्रीकांत देशपांडे , शैलेंद्र कंगळे ,शिक्षण विवेक प्रतिनिधी बाळासाहेब चव्हाण, मिलिंद जोशी, लक्ष्मी घुगे, उपस्थित पालक व विद्यार्थ्यांच्या हस्ते ऑगस्ट २०२३ अंकाचे प्रकाशन करण्यात आले. या अंकासाठी उपमुख्याध्यापक श्री बलभिम नळगीरकर, विभाग प्रमुख प्रशांत पिंपळे यांनी शिक्षण विवेक अंकाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी शाळेतील शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते