राष्ट्रभक्तीची मशाल घेऊ हाती
आपण सारे एक भारतवासी ॥धृ ॥
गाऊ एकतेचे गाणे न्यारे
एक होऊनि आपण सारे
दशोदिशी गातील हे वारे
आपल्या कर्तृत्वाचे पोवाडे
उजळवू या, लावू या सारे
हृदयात ज्ञानाच्या ज्योती ॥1॥
वंदुनी क्रांतीवीर, शूरवीरांस
स्मरूनी तयांच्या त्यागास
या आपण संकल्प करूया
साधण्या राष्ट्र नव विकास
एक दिलाने करू या सारे
ही भारताची सुंदर धरती ॥2॥
अपुला श्वासध्यास भारत देश
आपण ठेवू या सदा अखंडित
लावुनी मनोमनी समतेचे दीप
गाऊ मानवतेचे सदैव गीत
या अजरामर करू या सारे
अपुल्या भारतमातेची ख्याती ॥3॥
राघवेंद्र रामकृष्ण गणेशपुरे
डी.ई.एस. सेकंडरी शाळा, पुणे.