'देश हा देव असे माझा' आणि 'work is worship' या दोन म्हणी मला खूप आवडतात. या दोन्हीही म्हणी एकमेकांना पूरक अशा आहेत. जर आपण आपल्या देशाला आपला देव मानत असू, तर आपण या आपल्या देशाची किंवा आपल्या देवाची पूजाही आपल्या कामातूनच करायला हवी. कारण मला असं वाटतं की, या देशात जर प्रत्येकाने आपापलं काम व्यवस्थित पार पाडलं, तर खरंच ती या देवाची, देशाची पूजाच होईल. या देशसेवेतूनच आपली राष्ट्रभक्ती व्यक्त होत असते. आपल्या या देशात अनेक खेळाडू, कलाकार हे आपापले काम सचोटीने, काटेकोरपणाने पार पाडून, आपले, आपल्या देशाचे एका अशा राष्ट्रीय पातळीवर नाव मोठे करत असतात. अशाच काही खेळाडूंचा त्या खेळातील उच्चांक आणि त्या माध्यमातून त्यांनी या देशाची, ज्या प्रकारे राष्ट्राची केलेली सेवा मी इथे आज मांडणार आहे.
मित्रांनो ही गोष्ट आहे, हिमा दास या धावपटूची. हिमा एका अतिशय गरीब कुटुंबात जन्माला आली. या मुलीला लहानपणापासूनच स्कूलमध्ये फुटबॉल खेळायला आणि धावायला आवडायचं. तिच्या घरी शेती होती. ती रोज त्या शेतीत धावायची. त्यामुळे तिचा धावण्याचा वेग खूप वाढला होता. ज्या वेळी हिमा आंतराष्ट्रीय स्तरावर खेळू लागली. त्या वेळी तिच्या वडिलांनी तिला साध्यातले साधे बूट आणून दिले. तिने त्या वर ‘आडिडास’ या ब्रँडचे नाव कोरले आणि आज आडिडास या ब्रँडने केलेल्या बुटांवर हिमा दास हे नाव लिहिले. तर ही आपल्या देशाची ‘गोल्डन गर्ल’. ‘ढिंग एक्सप्रेस’ एका गरीब परिवारातून इतकी राष्ट्रभक्ती दाखवत असेल तर आपण ही आपल्या कामातून राष्ट्रभक्ती दाखवू या!!
- श्रीजा देव, 7वी,
व्हिजन इंग्लिश मेडीयम स्कूल, पुणे.