न पाहिले मज कोणी, न जाणिले माझे सामर्थ्य त्याहून
न ओळखिले मज कोणी, न जाणिले त्याहून।
मी निघाले शब्दांच्या कडव्या वारांत तावून सलाखून
अन् अंतरंगी दडलेल्या दु:खात पुरती न्हाऊन ॥1॥
हिणवले मज म्हणून अहंकारी अहंकारी
याच अहंकारावर बसून करेल मी सप्ततारकांची सवारी
सांगा त्या जगाला मज नाही फरक पडत काही
अचंबित होईल हेच जग माझे सामर्थ्य पाहून जे नाशवंत नाही ॥2॥
न ओळखिले माझे दु:ख कोणी माझ्या डोळ्यांत पाहून
मीच नाही दाखवू शकले त्यांचे स्वार्थी हेतू पाहून।
हे दु:ख पचविले मी स्वत:ला आरशात निरखून पाहून
मीच घेतले स्वत:ला जीवनाच्या दु:खद लाटांत वाहून ॥3॥
न समजिले मज कोणी, हट्ट असा ही नाही की समाजावे
पण दूर अंतरंगात बुडालेल्या सिद्धीस कोणी एकदातरी पहावे।
समजेल मज कोणी असे एकदा तरी मिणवे
नाहीतर दूर सातासमुद्रापलीकडे जाऊन आपले दु:ख काव्यातून व्यक्त करत राहावे ॥4॥
सिद्धी शंकर दसगुडे
महिलाश्रम हायस्कूल कर्वेनगर