बरसल्या काव्यसरी

"पाऊस श्रावण घनातला पाऊस माझ्या मनातला"

शिक्षण विवेक    18-Sep-2023
Total Views |
 
बरसल्या काव्यसरी
विद्यामंदिर मांडा टिटवाळा शाळेत शुक्रवार दि.15-9-2023 रोजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील भावना काव्यात व्यक्त कराव्यात, काव्याची आवड विद्यार्थ्यांत वाढावी या हेतूने श्रावण महिन्याचे औचित्य साधून इ .5 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी "पाऊस श्रावण घनातला पाऊस माझ्या मनातला" हा स्वरचित काव्यवाचनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कवयित्री , मुख्याध्यापिका जिजाई बालमंदिर ठाणे पूर्व शाळेच्या मा सौ.ऋतूजा गवस मॅडम व शहरनामा साप्ताहिकाच्या उपसंपादिका मा.सौ.ज्योती जाधव‌ मॅडम या उपस्थित होत्या.कार्यकमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
सदर कार्यक्रमास उस्फूर्तपणे विद्यार्थी सहभागी झाले व 54 विद्यार्थ्यांनी एकाहून एक सरस अशा स्वरचित कविता सादर केल्या.या कवितांमधून विद्यार्थ्यांनी श्रावणातला निसर्ग, पावसाचं सुंदर वर्णन काव्यात्मक शैलीत सादर केलं.
सदर कार्यक्रमाचे छान सूत्रसंचालन सौ.दीपिका पाटील मॅडम नी केले.मा.मुख्याध्यापक वाव्हळ सरांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश व्यक्त केला.आलेल्या दोन्ही मान्यवर पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करुन अशाच नवनवीन कविता करत रहा असे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.
सदर कार्यक्रमाचे रेखीव असे फलकलेखन धोधडे सरांनी केले.
उपस्थित सर्वांचे आभार श्री.साळुंखे सरांनी मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.
सौ.सायली कुलकर्णी
विद्यामंदिर मांडा टिटवाळा