आपण सर्व जण म्हणजे मी, तुम्ही, तुमची आर्ई, आजी, दादा किंवा तार्ई टि.व्ही. पाहतो. आपण ते फक्त मनोरंजनासाठी पाहतो. पण ज्याच्यातून आपण काहीतरी शिकले पाहिजे. जसे आपले वडील किंवा आजोबा बातम्या बघतात किंवा पेपर वाचतात. त्यातून त्यांना समाजातल्या घडामोडी समजतात आणि त्यावर ते आपले मत मांडतात. पण मी, तुम्ही, आई, आजी, तार्ई किंवा दादा नुसतेच टि.व्ही. सिरीयल, पिक्चर आणि कार्टून पाहतो. आपणही त्यातून काहीतरी शिकले पाहिजे. ज्या पिक्चर, कार्टून, सिरीयलमध्ये काहीच शिकण्यासारखे नाही. त्या आपण खरं तर पाहू नये. त्याऐवजी आपण देवांच्या, पुराणकाळातल्या थोर व्यक्तींच्या सिरियल किंवा पिक्चर पाहायला हवेत. त्यांतून आपल्यामध्ये श्रद्धा, भक्ती आणि देशप्रेमाची भावना निर्माण होते. त्याच्यातून काहीतरी शिकणे म्हणजे नुसते पाहणे आणि मग सोडून देणे नाही तर नाही तर आपल्याला तसे वागले पाहिजे. तेव्हाच मला किंवा तुम्हांला टि.व्ही. सिरियल, कार्टून किंवा पिक्चरमधून काय हवंय याचं उत्तर मिळेल.
- प्रांजल चव्हाण,
कन्याशाळा वाई