विद्यार्थ्यांनी बनवल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्ती
दिनांक - १३/९/२३, वार - बुधवार रोजी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ विमलाबाई गरवारे प्रशालेत पर्यावरण स्नेही गणपतीच्या मूर्ती बनविण्याची कार्यशाळा पार पडली. यात 48 मुलामुलींनी भाग घेतला. विज्ञान भारती व सौ विमलाबाई गरवारे प्रशाला ह्यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा प्रसिद्ध मूर्तिकार श्री दिलीप ठकार यांच्या मार्गदर्शना खाली संपन्न झाली. सुरवातीला श्री दिलीप ठकार यांनी उपस्थिताना गणपती बनवूंन दाखविले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या कृतीचा लक्षपूर्वक अभ्यास केला व आपापल्या कल्पनेने गणपती साकारण्यास सुरवात केली. श्री व सौ ठकार दाम्पत्या बरोबर त्यांचे एक स्नेही व श्री मधुसूदन नातू मूलामुलींना मार्गदर्शन करण्यास सामील झाले.गणेश मूर्ती घडविण्यात सर्व मुलेमुली तहान भूक विसरून दंग झाले होते. वेळोवेळी मार्ग दर्शन मिळत असल्याने त्यांचा उत्साह द्विगुणित झाला होता.जस जशी मूर्ती आकार घेऊ लागली तासतासानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील भाव आनंदी दिसू लागले व एक स्वनिर्मितीची अनुभूती त्यांच्या चेहऱ्यावर झळकली. सर्वांनी आपली कला गणेशाला वेगळे आकार देऊन दाखविली. गणेशमूर्ती मांडून ठेवल्यावर हे प्रकर्षाने जाणविले.
स्वनिर्मितीचा आनंद वेगळाच असतो व त्यात क्रियाशिलतेला भरपूर वावं असतो याची अनुभूती कार्यशाळेत जाणविली. या कार्यशाळेचा मुख्य हेतू मुला मुलींची creativity वाढविणे व त्यांची कुशलता वाढीस लावणे हा होता तो बऱ्याच अंशी यशस्वी झाला असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
अपेक्षेपेक्षा सुबक मूर्ती मुला मुलींनी घडविल्या व त्यात आपआपले गणपती बनविण्याचे वेगळेपण जपले. शाळेचे माजी विद्यार्थी श्री विलास रबडे यांचे सहकार्य या कार्यशाळेसाठी लाभले. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन सूत्रसंचालन शिक्षिका सौ मेघना देशपांडे यांनी केले. कार्यक्रमासाठी मा. मुख्याध्यापिका सौ. अनिता नाईक मॅडम , उपमुख्याध्यापक श्री. संजय जाधव सर व पर्यवेक्षिका सौ. मार्गसिद्धा पवार मॅडम ह्यांचे बहुमोल सहकार्य लाभले.